धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी |तालुक्यातील पाळधी गावातील ठाकूर वाडा येथे वृध्दाचे बंद घर फोडून घरातून २४ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, विलास विठ्ठल वाणी वय ६७ रा. ठाकूरवाडा, पाळधी ता.धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शनिवारी १३ जानेवारी सकाळी सायंकाळी ७ वाजता विलास वाणी हे त्यांच्या नातेवाईकाकडे घर बंद करून बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातून २४ हजार ५०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी रविवारी १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता समोर आला. त्यांनी याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार दुपारी ४ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.