जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एसटी वर्कशॉपजवळ राहणाऱ्या एका सोनार कारागीर याची बंद घर फोडून घरातून २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून येण्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेतीन वाजता उघडकीला आले आहे. या संदर्भात बुधवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश हिरामण सोलंकी वय-४१, रा. एसटी वर्कशॉप जवळ, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून सोन्याचे दागिने बनवण्याचे ते काम करत असतात. २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर बंद असताना मुख्य दरवाजाचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून लोखंडे कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकुण २ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना उघडकीला आल्यानंतर सुरेश सोलंकी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहे.