अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात वृध्द महिलेचे बंद घर फोडून घरातील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ६९ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथे वनाबाई देवराम पाटील वय-७५ या वृध्द महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता त्या घराला कुलूप लावून नाशिक येथील नातेवाईकांकडे गेल्या होत्या.
दरम्यान वृध्द महिलेचे घर बंद असल्याची संधी साधत बंद घराचे कडी कोयंडा तोडून घरातील लाकडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण ६९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेले. वृध्द महिला वनाबाई पाटील यांनी अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदेश पाटील हे करीत आहे.