जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव तालुक्यातील उमाळा भागात महावितरण कंपनीचे विद्युत तार व विद्युत खांब यांची चोरी झाल्याचे प्रकार समोर आला आहे याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी वीज वाहिनीचे तार व विद्युत खांब चोरीच्या घटना घडत आहे. आता पुन्हा उमाळा भागातून चोरट्यांनी साहित्य लांबविले आहे. या भागात भारनियमन सुरू असल्याची संधी साधत चोरच्यांनी ३० हजार रुपये किमतीचे ५२० मीटर ॲल्युमिनियम तार, दोन हजार रुपये किमतीचे खांब चोरट्यांनी चोरून नेले. महावितरणचे कर्मचारी या भागात पाहणी करीत असताना १५ जुलै रोजी ही चोरी लक्षात आली.
या प्रकरणी वायरमन धनराज भंगाळे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफूर तडवी करीत आहेत.