जळगाव प्रतिनिधी । शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दवाखान्याचे बांधकाम ठिकाणाहून स्वीच व इलेक्ट्रिक वायर असा एकुण १३ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, डॉ. राहुल अरुण चिरमाडे (वय-३७) रा.जानकी नगर गणेशवाडी यांचे नवीन पंचमुखी हनुमान मंदिराजवळ दवाखान्याचे बांधकामाचे काम गेल्या महिन्याभरापासून सुरू आहे. 21 मार्च रोजी सकाळीच्या 4 ते सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी दवाखान्याचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून 32 नग एमसीबी स्विच आणि 100 फूट इलेक्ट्रिक वायर असा एकूण 13 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी डॉ. राहुल चिरमाडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहे.