जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पिंप्राळा हुडको येथील महावितरण कंपनीचे उपकेंद्रातील कंट्रोलरूम मधून इलेक्ट्रिक सामान आणि पेन ड्राईव्ह असा एकूण ५ हजार ७०० किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवार २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजता उघडकीला आले आहे. यासंदर्भात सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आले आहे. राहुल सुरेश आरके वय-२५, रा. पिंप्राळा हुडको, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
रामानंद नगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात महावितरण कंपनीचे उपकेंद्र कंट्रोल रूम आहे. या ठिकाणी शुक्रवार २९ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास या रूममध्ये ठेवलेले पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रिक मीटर, सिंगल व थ्री फेज आणि इलेक्ट्रिक साहित्य असा एकूण ५ हजार ७०० किमतीचा मुद्देमाल संशयित आरोपी राहुल सुरेश आरके याने चोरून नेला. ही बाब लक्षात आल्यानंतर महावितरण कंपनीचे कर्मचारी मोहन काशिनाथ भोई यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी राहुल सुरेश आरके याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशय त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस नाईक रेवानंद साळुंखे हे करीत आहे.