चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील लासुर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या स्टोअर रूम मधून २५ हजार रूपये किंमतीची इलेक्ट्रीक कॉपरची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातून लासुर गावी येथे हायस्कूलजवळ ग्रामपंचायतीच्या मालकीचे पाण्याची टाकीजवळ स्टोअर रूम आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीचे असलेले वायर, केबल, विद्यूत पंप ठेवले जाते. दरम्यान २० सप्टेंबर सायंकाळी ६.३० ते २१ सप्टेंबर सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी स्टोअर रूममधून २५ हजार रुपये किंमतीची चौदाशे फूट लांबीची थ्री फेज कॉपर वायर चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी गावातील पाणीपुरवठा कर्मचारी शरद कोळी (वय-४१) रा. लासुर ता. चोपडा यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील पोलिस हेड कॉन्स्टेबल शिवाजी बाविस्कर करीत आहे.