जळगाव प्रतिनिधी । हातउसनावारीने १० लाख रूपये घेऊन डंपर नावावर करुन न देता चोरुन नेल्याचा प्रकार गुरुवारी २५ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास कालिंकामाता परिसरातील योगेश्वरनगरात घडला. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिलीप शामलाल पुरोहित (वय ३८, रा. योगेश्वरनगर) यांच्या ताब्यातील हा डंपर (एमएच १९ झेड ९९१२) आहे. पुरोहीत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, राजेंद्र देवगिरी गोसावी, मोहन देवगिरी गोसावी यांनी वेळोवेळी पुरोहीत यांच्याकडून हातउसनवारीने १० लाख रुपये घेतले होते. पैसे परत न केल्यामुळे गोसावी यांनी संबधित डंपर पुरोहीत यांच्या ताब्यात दिले होते. दरम्यान, १० लाख रुपये परत मिळवण्यासाठी पुरोहीत यांनी न्यायालयात धाव घेत गोसावी यांना नोटीस काढली होती. त्यावर त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे. या उलट डंपर पुरोहित यांना धमकी देऊन डंपर परत नेण्याचा प्रयत्न केला होता. तसेच पुरोहीत यांचे चालक हुसेन शेख हे जीपीएस यंत्रण बसवण्यासाठी डंपर घेऊन गेले असता गोसावी यांनी अडवुन त्यास मारहाण केली होती.
या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल आहे. असे असताना राजेंद्र गोसावी, मोहन गोसावी, गौरव गोसावी, सौरव गोसावी व अन्य दोन अनोळखी तरुणांनी गुरुवारी २५ मार्च रोजी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास पुराहित यांच्या घराबाहेर उभा डंपर चोरुन नेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणी पुराहित यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.