कडगाव शेत शिवारातून डिझेल पंपाची चोरी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कडगाव शिवारातील शेतातून पंप हाऊसचे सुरू असलेले कामाच्या ठिकाणाहून डिझेल पंप सेट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नशिराबाद पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, जयंत फकीरचंद कोठारी (वय-५३) रा. कडगाव ता.जि. जळगाव यांचे कडगाव शिवारात शेत आहे. शेतातील पंप हाऊसचे काम सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी डिझेल पंप नवीन सेट आणण्यात आला आहे. या ठिकाणाहून डिझेल पंप अज्ञात चोरट्यांनी 9 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान चोरून नेल्याचे उघडकीला आले. परिसरात शोधा शोध आणि चौकशी केली असता मिळून आले नाही. जयंत कोठारी यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार संजय जाधव करीत आहे.

 

Protected Content