भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम शिवारातील १२ शेतकऱ्यांच्या शेतातून ईलेक्ट्रीक मोटारमधून तांब्याच्या ताराकाढून चोरून नेल्याची घटना बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. यात शेतकऱ्यांचे सुमारे ३ लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील पिंप्रीसेकम गावाच्या शेत शिवारातून १२ शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीजवळील ईलक्ट्रीक मोटारमधून तांब्याच्या तारांची चोरी केल्याची खळबळजनक घटना बुधवारी २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. यात शेतकरी गणेश सुखदेव तायडे, पुंडलिक चुडामंत तायडे, प्रकाश रामभाऊ बानाईत, मुलचंद हरचंद तायडे, गणेश डोंगर तायडे, संजय पोलाद तायडे, विजय तायडे, भालचंद्र तायडे, ज्ञानदेव रामभाऊ बानाईत, तुकाराम सिताराम तायडे, आत्माराम सिताराम तायडे, सुखदेव चुडामंत तायडे यांचा समावेश आहे. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर शेतकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. ऐन महत्वाच्या वेळेस पिकांना पाणी देण्याची वेळ असतांना अज्ञात चोरट्यांनी हा प्रकार समोर आला आहे. दरम्यान या शेतकऱ्यांनी दुपारी ३ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे.