धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बेलदार शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ओम साई इलेक्ट्रिक दुकान फोडून २५ हजार रुपये किमतीचे ३५ किलो कॉपर वायरची चोरी केल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव शहरातील बेलदार शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील ओम साई इलेक्ट्रिक दुकान आहे. हे दुकान दीपक दिगंबर पाटील वय-३७ रा.पिंपळे ता.धरणगाव यांच्या मालकीचे आहे. नेहमीप्रमाणे दीपक पाटील यांनी दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाची खिडकी तोडून आत प्रवेश करत २५ हजार रुपये किमतीचे ३५ किलो वजनाचे कॉपर वायर चोरून नेले. हा प्रकार दुसऱ्या दिवशी उघडकीला आले. दरम्यान दुकानांमध्ये चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दुकानावर धाव घेतली. यावेळी खिडकीतून प्रवेश करून चोरी झाल्याचे उघडकीला आले. या घटनेबाबत दीपक पाटील यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेला तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.