जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील टी.एम. नगरातील रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील बांधकामाच्या ठिकाणाहून ३७ हजार रूपये किंमतीचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आली. याबाबत बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिमरण रमेश चेतवाणी वय ४१ ह्या आपल्या कुटुंबासह सिंधी कॉलनी परिसरात वास्तव्याला आहेत. एमआयडीसीतील डी.एम.नगर येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुसऱ्या घराचे बांधकाम सुरू आहे. २८ ते २९ डिसेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बांधकामासाठी लागणारे ३७ हजार रूपये किंमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार २९ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता समोर आला. या घटनेबाबत सिमरण चेतवाणी यांनी याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी ७ जानेवारी रोजी रात्री १० वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील हे करीत आहे.




