जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील काबरा तथास्तू बिल्डींग येथे बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेटांची चोरी चोरून नेल्याची घटना रविवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २४ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रिंगरोड परिसरात काबरा तथास्तू बिल्डींगचे काम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य ठेवण्यात आले आहे. याचबरोबर लोखंडी प्लेटा देखील ठेवण्यात आलेले होते. दरम्यान २२ नोव्हेबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी ५१ हजार रूपये किंमतीच्या १७ लोखंडी प्लेटा चोरून नेल्या. हा प्रकार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता समोर आला., याप्रकरणी येथील वाचमन गुड्डू पांडे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र ठाकरे हे करीत आहे.




