Home क्राईम एमआयडीसीतील कंपनीतून रोकडची चोरी

एमआयडीसीतील कंपनीतून रोकडची चोरी

0
128

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील एम सेक्टरमधील श्री गणपती इरीगेशन कंपनीचे पत्र्याचे शेड उचकावून ४५ हजारांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे नुकसान केल्याची घटना २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजता घडली होती. याप्रकरणी शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, मनोज हरी दलाल वय ३९ रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे एमआयडीसीतील एम सेक्टरमध्ये श्री गणपती इरीगेशन नावाची कंपनी आहे. २१ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे पत्र्याचे शेड उचकावून आत प्रवेश करत कंपनीतून ४५ हजारांची रोकड आणि येथील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नुकसान केले. त्यानंतर मनोज दलाल यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरी झाल्याबाबत तक्रार देण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.


Protected Content

Play sound