वरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरातील मकरंद नगरात राहणाऱ्या तरूणाचे बंद फोडून घरातून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकड असा एकुण ३ लाख ५१ हजार ७५३ रूपयांचा ऐवज चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, संदीप भिका वाघ वय ४० रा. मकरंद नगर, वरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शेती व मजूरीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. २३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता ते घराला कूलूप लावून कामानिमित्त निघून गेले होते. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकुण १ लाख ५३ हजार ७५३ रूपयांचा ऐवज चोरून नेला. घरात चोरी झाल्याचे २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आले. याप्रकरणी सोमवारी २६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता वरणगाव पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र जैन हे करीत आहे.