बांधकामाच्या ठिकाणाहून ईलेक्ट्रीक वायरच्या बंडलची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्रध्दा कॉलनीतील तरूणाच्या घराच्या बांधकामाच्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्याने २१ हजार ५९० रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक वायर बंडल चोरून नेल्याचे रविवारी १९ मे रोजी दुपारी १२ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील श्रध्दा कॉलनीत हेमंत बाळकृष्ण निंबाळकर वय ४० रा. महाबळ रोड, जळगाव यांचे घराचे बांधकाम सुरू आहे. त्याठिकाणी ईलेक्ट्रीक फिटींग करण्याचे साहित्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान, १६ मे रोजी सायंकाळी ६ ते रविवारी १९ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने घराच्या बांधकामाचे ठिकाणाहून २१ हजार ५९० रूपये किंमतीचे ईलेक्ट्रीक वायरचे बंडल चोरून नेले. चोरी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर हेमंत निंबाळकर यांनी सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजता रामानंद नगर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुशिल चौधरी हे करीत आहे.

Protected Content