गोठ्यात बांधलेली म्हैस चोरीला : गुन्हा दाखल

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दगडी मनवेल येथील वसंत कोळी यांच्या मालकीची (१ लाख रु. किंमतीची) म्हैस गोठ्यातून चोरुन गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात अज्ञान चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आज दिनांक ३१ मार्च रोजी गुरुवारी सकाळी आपल्या गोठयात गेले असता त्यांच्या निर्दशनास  हा प्रकार उघडकीस आला. दगडी मनवेल येथील शेतमजुर बाबुलाल कोळी यांचा जनावरांचा गोठा आहे. गोठ्यामध्ये वंसत कोळी हे जनावरांना वैरण टाकून झोपले होते. मध्यरात्री चोरट्यांनी गोठ्यात प्रवेश करून म्हैस चोरुन नेली.  या घटनेनंतर दगडी व परिसरातील गावांमध्ये जनावरांचे गोठे असलेल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असुन, या चोरीच्या घटनेबाबत काही जागृत नागरीकांनी सोशल मीडियावरही चोरीचा मेसेज पाठवून जनावरे आढळल्यास ? संपर्क करण्याचे सावध राहण्याचे ही आवाहन नागरीकांना करण्यात आले.

 

 

Protected Content