बांधकामाच्या ठिकाणाहून दीड लाखांच्या आसारींची चोरी

धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील बोहरा कब्रस्तानच्या बाजूला शोरूमचे बांधकामाच्या ठिकाणाहून दीड लाख रुपये किमतीचे लोखंडी आसाऱ्यांची चोरी झाल्याची घटना गुरूवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आले आहे. या संदर्भात रात्री ९ वाजता  धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील बहरा कब्रस्तानच्या बाजूला एका शोरूमचे बांधकामाचे काम सुरू आहे. बांधकामाच्या ठिकाणी बिल्डिंग मटेरियलचे सामान ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी लोखंडी असणाऱ्या देखील ठेवण्यात आलेले आहे. दरम्यान बुधवार २२ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते गुरूवार २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बिल्डिंग मटेरियल मधील दीड लाख रुपये किमतीचे आसाऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर दिनेश पुरुषोत्तम माळी (वय-३७) रा.परिहार नगर, धरणगाव यांनी धरणगाव पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक उमेश पाटील करीत आहे.

Protected Content