जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पिम्पडी शिवारात असलेल्या पाझर तलावात लावलेली १७ हजार रूपये किंमतीचा विद्यूत पंप आणि इलेक्ट्रिक मोटार स्टार्टर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेश जयेश पांडूरंग पाटील (वय-२२, रा. धानवड ता.जि.जळगाव) यांचे पिंपडी शिवारात शेत आहे. शेतापासून जवळ असलेल्या पाझर तलावात विद्यूत पंपाची लावलेले आहे. या पंपाद्वारे शेतीला पाणीपुरवठा केला जातो, दरम्यान २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ ते ३० एप्रिल सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी १७ हजार रुपये किमतीची विद्यूत पंप आणि स्टार्टर चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. परिसरात शोधाशोध करून कुठलीही माहिती प्राप्त न झाल्याने जयेश पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक संतोष पवार करीत आहे.