महावितरण कंपनीच्या अल्युमिनीअम तारांची चोरी

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उमाळा शिवारात असलेल्या महावितरण कंपनीच्या मालकीच्या अल्युमिनियमच्या तारांची चोरी करताना तीन जणांना रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी रविवार १८ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील उमाळा शिवारात असलेल्या प्रल्हाद झीपरू पाटील यांच्या शेताजवळ महावितरण कंपनीचे कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना त्यांना तीन जण अल्युमिनियमच्या तारांची चोरी करताना मिळून आले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता सुभाष ओमप्रकाश शर्मा (वय-२१) रा. अयोध्या नगर, प्रवीण ज्ञानेश्वर पाटील (वय-२०) आणि पंकज सुकलाल राठोड (वय-२२) दोन्ही रा. खेडी ता. जिल्हा जळगाव असे नाव सांगितले. या संदर्भात कर्मचारी सुभाष चंद्रकुमार गायधने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले आणि त्यांच्या फिर्यादीवरून सायंकाळी ५ वाजता संशयित आरोपी शुभम शर्मा प्रवीण पाटील आणि पंकज राठोड या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुदस्सर काझी करीत आहे.

Protected Content