Home क्राईम संजीवणी हॉस्पिटलसमोरून तरूणाच्या दुचाकीची चोरी

संजीवणी हॉस्पिटलसमोरून तरूणाच्या दुचाकीची चोरी


जळगाव प्रतिनिधी । शहरातील संजीवणी हार्ट हॉस्पिटल समोरून तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुषण प्रकाश राजपूत (वय-३६) रा. हिराशिवा कॉलनी, खोटे नगर हे शहरातील कॅथलॅब टेक्नीशीयन म्हणून संजीवनी हॉस्पीटलमध्ये कामाला आहे. कामावर ये-जा करण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ डीएल २४४१) क्रमांकाची दुचाकी आहे. २१ एप्रिल रोजी रात्री ११ वाजता ते कामावर आले. त्यावेळी त्यांनी त्यांची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी हॉस्पीटल समोर पार्कींग करून लावली. दुसऱ्या दिवशी २२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता घरी जाण्यासाठी निघाले असता पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही दुचाकी मिळाली नाही. दुचाकी चोरी प्रकरणी भुषण राजपूत यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ललीत भदाणे करीत आहे. 


Protected Content

Play sound