जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या समोरून एका तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ३१ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी १ जून रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेख ईलीयास शेख रियाज वय-२६ रा. पटेल कॉलनी भुसावळ हा तरूण आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी ३१ मे रोजी दुपापरी १ वाजता तो त्याची दुचाकी एमएच १९ डीजी ६३८३ ने जळगाव शहरातील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आलेला होता. त्यावेळी त्याने दुचाकी गेटसमोर पार्कींगला लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्याची दुचाकी चोरून नेली. ही घटना समोर आल्यानंतर त्याने दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी मिळून आली नाही. अखेर शनिवारी १ जून रोजी दुपारी ४ वाजता जिल्हापेठ पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सलीम तडवी हे करीत आहे.