जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रायसोनी नगर येथील घरासमोर उभे दुचाकी चोरीस गेल्याप्रकरणी गुरुवार 24 नोव्हेंबर रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील जाकिर हुसैन कॉलनीत मीना भाईदास गवळे वय 39 या वास्तव्यास आहेत. त्या मजुरी काम करतात. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांची एम एच 20 बीजे 7953 या क्रमांकाची दुचाकी रायसोनी नगरातील प्रेस्टिजीएस अपार्टमेंट जवळ एका जनाच्या घरासमोर उभी केली होती. अवघ्या अर्धा तासाच्या अंतरात अज्ञात चोरट्याने हे दुचाकी चोरून नेली सर्वत्र शोध घेऊनही दुचाकी मिळून आल्याने पाच दिवसानंतर गुरुवारी मीना गवळे यांनी रामानंदनगर पोलीस हत्या तक्रार दिली या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विजय खैरे हे करीत आहेत.