भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील बसस्थानक समोरून तरूणाची ४० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २७ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तस्लिम कासम गवळी वय ३० रा. बिस्मिल्ला चौक, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २६ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता तस्लिम हा कामाच्या निमित्ताने भुसावळ बसस्थानक परिसरात दुचाकी क्रमांक एमएच १९ डीएम ४६४४ ने आलेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी ही बसस्थानकासमोरील मोकळ्या जागेत पार्कींगला लावलेली होती. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यांना दुचाकी मिळून आली नाही. अखेर शनिवारी २७ एप्रिल रोजी रात्री ११.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यांनी दिलेल्या खबरीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रमण सुरळकर हे करीत आहे.