जळगाव (प्रतिनिधी) नातवाला आणि मुलीला घरात मदत व्हावी म्हणून ५० हजार रुपये घेऊन जाणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीच्या खिशातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास बसस्थानकाजवळ घडली. याबाबत जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, रावण ओमकार पाटील (वय ६५ रा. धुके बुद्रुक ता. चोपडा) यांच्या मुलगीचे जळगाव तालुक्यातील धानवड -चिंचोली हे सासर आहे. मुलीला किरकोळ कामासाठी ५० हजार रुपये लागत असल्याने धानवड येथे जात असताना जळगाव बसस्थानकात लागलेली जळगाव जामनेर बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशात असलेल्या ५० हजार रुपयाचे बंडल काढून घेतले. आपल्या खिशातील ५० हजार रुपये चोरी गेल्याचे लक्षात येताच त्यांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली. जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ बसस्थानकात जाऊन सीसीटीव्हीचे फुटेज चेक केले. रावण पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.