भुसावळ प्रतिनिधी । येथील शहर पोलीस स्थानकापासून जवळच असणार्या तार ऑफिस रोडवरील सात दुकाने चोरट्यांनी फोडल्याने खळबळ उडाली आहे.
चोरट्यांना पोलीस प्रशासनाचा जराही धाक उरला नसल्याचे आता दिसून येत असून याचीच प्रचिती भुसावळ येथे आलेली आहे. येथील शहर पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असणार्या तार ऑफीस रोडवरील व्यापारी संकुलातली सात दुकाने चोरट्यांनी फोडल्याचे आज पहाटे उघडकीस आले आहे. ही माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी सुरू केली आहे. तर दुकानांचे मालकदेखील दाखल झाले असून यात चोरट्यांनी नेमका किती डल्ला मारला याचा अंदाज घेतला जात आहे. अर्थात पोलीस स्थानकापासून जवळच असणारी दुकाने फोडल्याने चोरट्यांना पोलिसांचा जराही धाक उरला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.