बोदवड येथील दोन महिलांच्या घरात चोरी, दोघे अटकेत

बोदवड लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।बोदवड शहरातील हनुमान नगरात राहणाऱ्या दोन महिलांच्या बंद घरातून चोरी झाली आहे. चोरट्यांनी चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण साडेपाच हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

गीताबाई रामकृष्ण गंगतीरे (वय 59) आणि रुखमाबाई कोळी दोन्ही महिला बोदवड शहरातील हनुमान नगरात वास्तव्याला आहेत. १३ फेब्रुवारीच्या मध्यरात्री दोन वाजता दोन जणांनी त्यांच्या घरात घुसून चोरी केली. या संदर्भात गिताबाई गंगतीरे यांनी बोदवड पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक अरविंद घोडे यांनी कारवाई करत संशयित आरोपी शेख समीर शेख जाकीर (वय-२२, रा. जामनेर) आणि मोहेउद्दीन सय्यद मुखी (वय-२२, रा.जामनेर) या दोघांना अटक केली आहे.

Protected Content