चाळीसगाव प्रतिनिधी । शिक्षक दांपत्य शाळेवर गेल्याचा फायदा घेत घराचे कुलुप तोडुन कपाटात ठेवलेले रोख रक्कमेसह सोनेचांदीचे दागिने असे एकुण ६६ हजार ७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे. ही घटना दि.२ रोजी सकाळी ११-३० ते सायंकाळी ५-३० वाजेच्या दरम्यान तालुक्यातील टाकळी प्र.चा येथील सप्तश्रृंगी नगरात घडली आहे. याबाबत चा.श. पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल भिकनराव चव्हाण (वय-४९) रा. सप्तश्रृंगी नगर टाकळी प्र.चा. येथील रहिवासी आहेत. सुनिल आणि त्यांच्या पत्नी हे दोघे जण शिक्षक आहेत. नेहमीप्रमाणे दोघेजण दि.२ रोजी सकाळी ११-३० वाजेच्या सुमारास शाळेत गेले होते. सायंकाळी ५-३० वाजेच्या सुमारास त्यांच्या पत्नी शाळेतून घरी आल्या असताना घराचा दरवाजा तुटलेला व घरातील सामान अस्ताव्यस्त असल्याचे दिसले. त्यांनी त्याचक्षणाला सुनिल चव्हाण यांना या घटनेची माहिती दिली. ते घरी येवून पोलीसांना पाचारण केले तेव्हा घरातील कपाट बघितले असता त्यातील १८ हजाराच्या १० ग्रॅम सोन्याच्या लहान मुलाच्या १२ अंगठ्या, ९ हजाराचे ५ ग्रॅमचे सोन्याचे टोंगल, १२ हजार ६०० रुपयांचे ७ ग्रॅम सोन्याचे लॉकेट, ३६०० रुपयांचे २ ग्रॅम सोन्याचे पेंडल, १२ हजार ६०० रुपयांची ७ ग्रॅम सोन्याची चैन, ५४०० रुपयांच्या ३ ग्रॅम सोन्याच्या बाळ्या, १५०० रुपयांचे ५० ग्रॅम चांदीचे कडे व ३ एटीएम कार्ड व ४ हजार रुपये रोख असा एकुण ६६ हजार ७०० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्यांवर गुरन ३४९/२०१९ कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार बापुराव भोसले करीत आहेत.