Home क्राईम चाळीसगावात शिवसेना शहरप्रमुखांच्या घरी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

चाळीसगावात शिवसेना शहरप्रमुखांच्या घरी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

0
33
chalisgaon chori

chalisgaon chori

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील शिवसेना शहर प्रमुख श्यामलाल उर्फ नानाभाऊ कुमावत यांच्या घाट रोडवरच्या प्रभात गल्ली येथील राहत्या घरी चोरट्यांनी लाखोंचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत माहिती अशी की, नानाभाऊ कुमावत यांच्या राहत्या घरी काल रात्री मोठी चोरी झाली असून चोरट्यांनी घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतील कपाटातील त्यांच्या पत्नी, आई, व मुलीचे, सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. यासोबत जवळपास पन्नास हजार रुपये रोख रक्कम गेल्याचेही सांगितले आहे. गेलेले एकूण सोने अंदाजे १२ते १५ लाख इतक्या किमतीचे असावे असा प्राथमिक अंदाज आहे. त्याचबरोबर येथेच समोर असलेल्या शिंपी यांच्या घराचे कुलूप तोडून तेथेही चोरी झाली आहे. अत्यंत गजबजलेल्या असलेल्या या प्रभात गल्लीत ही चोरी होणे म्हणजे आश्‍चर्याची बाब मानली जात आहे.

या संपूर्ण परिसरात नेहमी रात्री उशिरापर्यंत राबता असतो. असे असतानाही ही चोरी म्हणजे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. नाना कुमावत यांना आपल्याकडे चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांशी संपर्क करून सदर घटना कळवली. यानंतर लागलीच घटनास्थळावर शहर पोलिस स्टेशनचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोही व पोलिस पथकाने भेट देऊन पाहणी केली असून सविस्तर माहिती घेऊन गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.


Protected Content

Play sound