जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील सेक्टर-एस मध्ये असलेल्या एका कंपनीतून ८ हजार रुपये किमतीची पाण्याची मोटार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत शनिवार १ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी भागातील सेक्टर-एस मध्ये एमएसजे इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. या कंपनीतून ३० ऑगस्ट रात्री ते १ सप्टेंबर दरम्यानच्या वेळेत अज्ञात चोरट्याने ८ हजार रुपये किमतीची पाण्याची इलेक्ट्रिक मोटर चोरून नेले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कंपनीचे किरण भागवत कोल्हे (वय-५२) रा. रणछोड नगर, जळगाव यांनी शनिवार १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जितेंद्र राजपूत करीत आहे.
एमआयडीसीतील कंपनीत चोरी
2 years ago
No Comments