यावल प्रतिनिधी । येथील एका सराफा व्यापार्याला लुटण्याची घटना घडली असुन यातल्या चार चोरटयांपैकी एकाला पकडण्यात नागरीकांना यश आले आहे.
या बाबतची माहीती अशी की यावल येथील शहरातील मेन रोड चावडी परीसरात असलेल्या समर्थ ज्वेलर्स चे मालक श्रीनिवास नंदकिशोर महालकर हे नेहमीप्रमाणे दिनांक १३ मार्च रोजी नेहमी प्रमाणे आपली सराफा दुकान रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आपली दुकान बंद आपली दुकान बंद करून बि.एस.एन.एल च्या समोरील आपल्या घरी जात होते. दरम्यान, स्वामी समर्थमंदीर च्या परिसरात दबा धरून बसलेल्या चार चोरटयांनी त्यांचा जवळची सुमारे ९ लाख रुपये किमतीच्या दागीन्यांची बॅग चाकुचा धाक दाखवुन दागीन्याची बॅग घेवुन पोबारा केला. यावेळी चोरट्यांच्या सोबत झालेलया झटापटीत श्रीनिवास महालकर यांच्या खांद्याच्या बाजुस चाकु लागला आहे. यावेळी आरडाओरड केल्याने परिसरातील युवकांनी धाव घेतली यावेळी नागरीकांच्या मदतीने एका भामटयास पकडण्यात यश आले असुन, त्यास अटक करण्यात आली असुन इतर आरोपींचा देखील शोध घेण्यात येत आहे.