जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील समता नगरातील शिवराम मंदीराजवळील घरासमोरून तरूणाची ९ हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
रामानंदनगर पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजेश सुरेश सैदाने (वय-२६) रा. शिवराम मंदीर जवळ, समता नगर, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. हातमजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. त्यांच्याकडे कामासाठी (एमएच १९ डीएम ७०२१) क्रमांकाची दुचाकी आहे. बुधवार ६ जुलै रोजी रात्री त्याने दुचाकी मंदीराजवळ पार्क करून लावलेली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ९ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आली. त्याने परिसरात दोन दुचाकीचा शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही आढळून आली नाही. अखेर शनिवार ९ जुलै रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे करीत आहे.