रिंगरोड येथून तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील रिंगरोड परिसरातील चिल्ड्रन हॉस्पिटलच्या  पर्किंगमधून तरूणाची १० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हादाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, विशाल लक्ष्मण सोनार (वय-२१) रा. अयोध्या नगर जळगाव हा तरूण रिंगरोडवरील चिल्ड्रन्स हॉस्पिटलमध्ये कामाच्या निमित्ताने २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता दुचाकीने (एमएच १९ बीएच ६९४९) ने आले.  त्यावेळी त्यांनी हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आपली दुचाकीन लावली होती. वयक्तिक काम आटोपून सकाळी ११ वाजता दुचाकीजवळ गेले असता दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध केली तरीही मिळाली नाही. अखरे शनिवार २७ नोव्हेंबर रोजी  जिल्हापेठ पोलीसात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.

Protected Content