जळगाव प्रतिनिधी । मित्रांसोबत शिरसोलीकडून परत येत असतांना रोडवरील बॅरिकेटला दुचाकी आदळल्याने मागे बसलेला प्रशांत चौधरी रा. नेरी ता.जामनेर हा जागीच ठार झाल्याची घटना २९ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. याप्रकरणी दुचाकीधारक विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांत रामकृष्ण चौधरी (४०, रा.नेरी ता.जामनेर) हा जळगाव शहरातील महेश सुभाष बागुल यांच्याकडे सोनार काम करीत होता. सोमवारी २९ मार्च रोजी संध्याकाळी तो योगेश सुरेश जाधव याच्यासोबत दुचाकीने (क्र.एम.एच.१९ सी.एच.९९९०) शिरसोली येथे जेवणाला गेला होता तेथून परत येत असताना सायंकाळी पाच वाजता लुंकड कंपनी जवळ वळणावर असलेल्या बॅरिकेट्सवर दुचाकी धडकली. त्यात मागे बसलेला प्रशांत चौधरी याच्या डोक्याला बॅरिकेट्स लागल्याने मेंदू बाहेर आला. त्यामुळे तो जागेवरच गतप्राण झाला तर योगेश जाधव हा जखमी झाला. दोघांना जिल्हा रुग्णालय दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रशांत त्याला मृत घोषित केले. दरम्यान महेश बागुल यांच्या फिर्यादीवरून योगेश जाधव रा. जळगाव याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोहेकॉ जितेंद्र राठोड करीत आहे.