जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील पडसोद येथे गल्लीतून जाण्याच्या किरकोळ कारणावरून तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी सळईने डोक्यात मारहाण करून दुखापत केल्याची घटना रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबबात अधिक असे की, जळगाव तालुक्यातील पडसोद गावात ३० वर्षीय तरूण हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाता तरूण हा त्यांच्या मामाच्या मुलासोबत संशयित आरोपी दिलीप देवराम पाटील याच्या गल्लीतून पायी जात होते. त्यावेळी दिलीप पाटील याने दोघांचा रस्ता आडवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच सोबत असलेले संजय तुकाराम पाटील, निलेश दिलीप पाटील, दिलीप देवराम पाटील सर्व रा. पडसोद ता.जि.जळगाव यांनी मारहाण केली. यातील एकाने हातातील लोखंडी सळई तरूणाच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर जखमी झालेल्या तरूणाला तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री ११ वाजता संशयित आरोपी दिलीप देवराम पाटील , संजय तुकाराम पाटील, निलेश दिलीप पाटील, दिलीप देवराम पाटील सर्व रा. पडसोद ता.जि.जळगाव याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक संदीप गावीत करीत आहे.