जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद गावातील पेठ भागात गैरसमजुतीतून एका तरुणाला ४ जणांकडून शिवीगाळ करत काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. ही घटना बुधवारी २० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कंडारी येथे योगेश समाधान सोनवणे हा आपला परिवारासह वास्तव्याला आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे व त्याच्या पत्नीत भांडण झाले होते. या गैरसमजुतीतून बुधवार २० डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता योगेश हा नशिराबाद पेठ भागात असताना नाना सुखदेव सोनवणे, योगेश नाना सोनवणे, ज्ञानेश्वर नाना सोनवणे आणि सिंधुबाई नाना सोनवणे सर्व रा. कंडारी ता. जि. जळगाव या ४ जणांनी शिवीगाळ करत लाकडी काठ्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर योगेश सोनवणे याने दुपारी ४ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात ४ जांनाविरोध विरोधात तक्रार दिली त्यानुसार नशिराबाद पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नाना सुखदेव सोनवणे, योगेश नाना सोनवणे, ज्ञानेश्वर नाना सोनवणे आणि सिंधुबाई नाना सोनवणे या चार जणांविरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.