जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील वाघ नगर येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना एका तरुणाने उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दिनेश मधुकर शिरसाठ (वय ३६, रा. वाघ नगर जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, दिनेश हा वाघ नगर येथे आई व पत्नीसह राहत होता. दिनेश डॉमिनोज पिझ्झा येथे काम करीत होता. तर त्याची पत्नी हि एका ब्युटी पार्लरमध्ये जॉबला आहे. गुरुवारी १९ रोजी दुपारी तो घरी आला. तेव्हा जेवण करून तो वरच्या खोलीत गेला. त्यानंतर तो खाली उतरला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी दुपारी ४ वाजता वरच्या मजल्यावर वरती जाऊन पाहिले तर दिनेशने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.
नातेवाईकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी त्यास तपासणीअंती मयत घोषित केले. तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.