दुचाकीवरून पडल्याने तरूणाचा जागीच मृत्यू

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर येथे जात असलेल्या दोघांची दुचाकी स्लीप झाल्याने दुचाकीवरील तरूणाला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना अमळनेर-धार रस्त्यावर घडली. तर दुचाकीवरील दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

राहूल लोटन निकम (वय-३८) रा. कळमसरे ता. अमळनेर असे मयत तरूणाचे नाव आहे. तर भीमराव चौधरी हे गंभीर जखमी झालेत.

यााबाबत अधिक माहिती अशी की, भीमराव चौधरी आणि राहूल निकम हे सोमवारी १० ऑक्टोबर रोजी अमळनेर येथे बाजारासाठी दुचाकीने आले होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास दोघे दुचाकीवरून घरी कळमसरे येथे जाण्यास निघाले. अमळनेर ते धार रस्त्यावरील हॉटेल चिन्मय समोर दुचाकी अचानक स्लीप झाल्याने राहूलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर भीमराव चौधरी हे गंभीर जखमी झाले. जखमीस तातडीने धुळे रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दुसरीकडे राहूल निकमचे अमळनेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघाताचे वृत्त कळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी धाव घेतली. अपघातातील जखमींना मारवड येथील युवकांनी तात्काळ अमळनेरकडे रवाना करण्यासाठी सहकार्य केले. दरम्यान अपघातातील राहुल निकम याची अत्यंत गरिबीची परिस्थिती आहे.त्याच्या पश्चात आईवडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. वडील टेलरिंग चे काम करतात.राहुलचा अतिशय शांत व संयमी स्वभाव असल्याने हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचे वृत्त कळताच गावात शोककळा पसरली आहे.

Protected Content