धक्कादायक : विद्यापीठातील वस्तीगृहातील खोलीत तरूणाचा टोकाचा निर्णय !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मुलांच्या वस्तीगृह क्रमांक ३ येथे एका अमरावती जिल्ह्यातील तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास उघडकीस झाली आहे. धरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्रतीक विजयराव गोरडे (वय १९, रा. शिरसगाव कसबा ता. चांदूरबाजार जि. अमरावती) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो विद्यापीठामध्ये मुलांचे वस्तीगृह क्रमांक ३ येथे खोली क्रमांक टी ४४७ येथे दोनच दिवसांपूर्वी राहायला आला होता. तसेच विद्यापीठात बी. टेक (प्लास्टिक) प्रथम वर्षाला शिक्षण घेत होता. त्याच्या खोलीमध्ये पाच सहकारी होते. बुधवारी ११ सप्टेंबर रोजी मुलांनी वस्तीगृहात बसलेल्या गणपती मंडळातील आरती केली. त्यानंतर मुले जेवण्यासाठी निघून गेली.

काही वेळानंतर मुलं जेवणावरून परतली. त्यावेळेला प्रतीक गोरडे याच्या खोलीमध्ये आतून दरवाजा लावलेला दिसून आला. त्यावेळी काही तरुणांनी खिडकीची काच तोडून पाहिले तर प्रतीक याने गळफास घेतलेला होता. या वेळेला इतर विद्यार्थी धावून आले. त्यांनी तात्काळ त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे उपचारासाठी विद्यापीठाच्या रुग्णवाहिकेत दाखल केले असता त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील, डॉ. सारंग, सुरक्षा निरीक्षक यांच्यासह विद्यापीठातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच रुग्णालयामध्ये जाऊन परिस्थिती जाणून घेतली. या घटनेबाबत धरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content