जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भगवान नगरमध्ये राहणारा एका तरुणाच्या खोलीतून ६० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरी केल्याची घटना सोमवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उघडकीला आले आहे. या संदर्भात दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यश धनंजय बोरसे वय-२८, रा. भगवान नगर, जळगाव हा तरुण वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. तो राहत असलेल्या खोलीतून सोमवारी १० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी तेजस रमेश चौधरी वय-३१, रा.न्यू पोस्टल कॉलनी, जळगाव यांनी चोरून नेल्याचे घटना उघडकीला आले आहे. त्यानंतर यश बोरसे या तरुणाने रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी तेजस रमेश चौधरी यांच्या विरोधात दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सूर्यवंशी हे करीत आहे.