शाळेजवळून तरूणाची दुचाकी लांबविली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील भगीरथ शाळेजवळ पार्कींगला लावलेले तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी शनिवारी २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  पराग विनायक चव्हाण (वय-२३) रा. डिंगबर नगर, भुसावळ हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता पराग हा त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीसी ३८३२) ने शहरातील भगीरथ शाळेजवळ आलेला होता. त्यावेळी त्याने त्याची दुचाकी पार्कींगला लावून कामानिमित्त निघून गेला होता. दरम्यान अज्ञात चोरट्याने त्याची पार्कींगला लावलेली दुचाकी चोरून नेली. काम आटोपून पराग चव्हाण हा दुचाकीजवळ आला. त्याला जागेवर दुचाकी मिळून आली नाही. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल जोशी करीत आहे.

Protected Content