तीन तासांचा अथक प्रयत्न
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जळगाव शहरातील ज्ञानेश्वर नगरातील श्रावण नगराजवळील शेतातील विहिरीत एका वेडसर अनोळखी तरूणाने विहिरीत उडी घेतल्याची घटना गुरूवारी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. ही घटना घडल्यानंतर शनीपेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने धाव घेवून तीन तासांच्या अथक प्रयत्नाने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील ज्ञानेश्वर नगरातील श्रावण नगरजवळील गट नंबर ५१ शिवारात विवेक जगताप यांचे शेत असून या शेतात विहिर आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून एक अनोळखी वेडसर तरूण हा फिरत होता. या वेडसर तरूणाने गुरूवारी ११ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. दरम्यान ही घडल्यानंतर स्थानिक नागरीकांनी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक नागरीकांनी शनीपेठ पोलीसांना कळविण्यात आले. त्यानुसार शनीपेठ पोलीस ठाण्याचे पीएसआय योगेश ढिकले, पीएसआय मुबारक तडवी, पो.कॉ. विजय खैरे, मुकेश गंगावणे, नवनित चौधरी यांनी धाव घेतली. त्यानुसार अग्नीशमन विभागाचे चालक प्रकाश चव्हाण, गंगाधर कोळी, संजय तायडे, पिंटू पाटील, राजू चौधरी यांनी देखील धाव घेतली. तब्बल तीन तासांच्या यशस्वी प्रयत्न केल्याने रात्री ८ वाजता बाहेर अनोळखी तरूणाला बाहेर काढण्यात आले.