आकस्मिक मृत्यू झालेल्या तरूणाची ओळख पटली

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील लेंडी नाल्याजवळ अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आला होता. त्यांची ओळख पटली असून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

 

ज्ञानेश्वर नरहर दुसाने  (वय-३०) रा. कांचन नगर, जळगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर दुसाने हा आपल्या वडीलांसह वास्तव्याला आहे. हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. गेल्या काही महिन्यांपासून त्याला दारूचे व्यसन होते. सोमवारी २ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शहरातील लेंडी नाला परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला होता. सुरूवातील अनोळखी म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची ओळख पटली होती. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी ३ मे रोजी सकाळी १० जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्याच्या पश्चात वडील आणि दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. पुढील प्राथमिक तपास अभिजित सैंदाणे करीत आहे.

Protected Content