लघुशंकेला थांबलेल्या तरूणाची दुचाकी लांबविली

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसीतील एम सेक्टर जवळ लघुशंकेला गेलेल्या तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याचे उघडकीला आले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, रामशरण चांदबली यादव (वय-३६) रा. सुधाकर प्लॉट एमआयडीसी हा खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. २९ मे रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील एम सेक्टरमध्ये सब स्टेशन जवळून दुचाकी (एमएच १९ डीएफ ६४७५) ने जात होता. त्यावेळी दुचाकी थांबवून लघुशंकेला गेला. त्याचवेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लांबविली. परीसरात शोध घेवूनही दुचाकी मिळाली नाही. रामशरण यादव यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे. 

 

Protected Content