उच्च दाबाच्या विद्यूत तारेला धक्का लागल्याने तरूणाचा हात निकामी

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथे आजीच्या दशक्रीया विधीसाठी आलेल्या तरूणाला घराच्या समोरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत तारेला हाताचा धक्का लागल्याने गंभीर जखमी होवून त्याचा उजवा हात कायमचा निकामी झाला आहे. महाविरण विभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना देण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील रहिवाशी केशव भाईदास पाटील हे आपल्या कुटुंबियांसह पुण्यात वास्तव्याला आहे. खासगी व्यवसाय करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याची आई सुमन पाटील यांचे २१ मे रोजी निधन झाले होते. त्यामुळे केशव पाटील हे पत्नीसह अथर्व व ऋषीकेश यांच्यासह भुसावळ येथे आले होते. ३० मे रोजी त्यांच्या आईचा दशक्रिया विधी असल्याने केशव पाटील, त्यांची पत्नी आणि अथर्व पाटील हे भुसावळ येथे थांबून होते. २९ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांनी कार्यक्रमासाठी पाण्याच्या टँकर बोलावला होता. खाली टँकर वाल्याने आवाज दिला. त्यावेळी अर्थव हा गच्चीवरून खाली डोकावून पाहत असतांना घराच्या समोरून गेलेल्या उच्च दाबाची विद्यूत तारेला त्याच्या हाताचा धक्का लागला. त्यावेळी केशव पाटील हे त्याच्या मागेच होते. विजेचा जोराचा धक्का लागताच केशव पाटील यांनी कॉटवरील उशीच्या सहाय्याने अथर्वला पुश केले त्यामुळे अथर्व हा बाजूला पडला व केशव हे विरूध्द दिशने पडले. त्यामुळे अथर्व बचावला. दरम्यान या घटनेत अथर्वचा उजवा हात पुर्णपणे जळाल्याने निकामी झाला तर उजवा पायाची मांडी गंभीररित्या जखमी झाली. त्याला तातडीने जळगाव येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अथर्वचा महत्वाचा उजवा हात निकामी झाल्याने मोठे संकट पाटील कुटुंबावर कोसळले आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मुलाच्या हाताचे नुकसान झाले असल्याचा आरोप केशव पाटील यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावी अशी मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे यांना देण्यात आले आहे. शिवाय मुलाच्या नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने द्यावी अशी देखील मागणी केली आहे.

Protected Content