गळफास घेवून तरूणाने संपविली जीवनयात्रा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गढोदा येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

जितेंद्र गोपाल सपकाळे वय 35 रा.गढोदा ता. जि. जळगाव असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जितेंद्र सपकाळे हा आपल्या आई, पत्नी, भाऊ, वहिनी यांच्यासह वास्तव्याला आहे. बँड पथकात वाजंत्रीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान त्याची आई दुर्धर आजाराने ग्रासलेली असल्याने तिला उपचारासाठी त्याचा भाऊ सिद्धार्थ आणि बहीण यांनी गेल्या महिन्याभरापासून पुण्यात उपचारासाठी दाखल केले आहे. त्यामुळे जितेंद्र हा घरी एकटाच होता. मंगळवार २८ जून रोजी दुपारी गल्लीतील काही मुलांसोबत जितेंद्र सपकाळे हा बसलेला होता. त्यानंतर राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गल्लीत खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात आला. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जितेंद्र सपकाळे मृतदेह खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणला. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्याला मृत  घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

याबाबत जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे. मयतच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, वहिनी आणि एक बहीण असा परिवार आहे.

 

Protected Content