तरूण शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील नेरी दिगर येथील एका तरूण शेतकऱ्याची दुचाकी बाजार समितीच्या आवारातून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, ऋषीकेश मदनसिंग पाटील (वय-२३) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. सोमवार २१ ऑगस्ट रोजी कामाच्या निमित्ताने ऋषीकेश हा त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीएम ४४७) ने जामनेर तालुक्यातील नेरीदिगर येथील बाजार समितीत आला होता. त्यावेळी त्याने दुचाकी बाजार समितीच्या आवारातच लावलेली होती. दरम्यान, दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे समोर आले. त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही अखेर सोमवारी २१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अतुल पवार करीत आहे.

Protected Content