यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “तालुका जिथे क्रिडा संकुल तिथे” असे धोरण राज्य सरकारचे असुन यावल तालुक्यात अनेक वर्षापासुन आज ही यावल शहरात किंवा तालुक्यात क्रिडा संकुलाची कामे सरू होऊ शकलेले नाही. ते काम लवकरात लवकर पुर्ण करावे अशी मागणीचे निवेदन मनसेच्या वतीने केंद्रीय मंत्री खा. रक्षा खडसे यांना देण्यात आले.
राज्यात राष्ट्रीय आणि आतंरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविधा व्हाव्यात यासाठी त्रिस्तरिय क्रिडा संकुलनाची उभारणी करण्याचे धोरण राज्य सरकारचे आहे. यावल तालुकास्तरीय क्रिडा संकूलनाचा समावेश आहे . यावल तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रातील होतकरू मुलांना खेळात नैपुण्य प्राप्त करण्याची संधी उपलब्ध व्हावी, हा या धोरणामागचा उद्देश आहे. मात्र शहरी जिल्हास्तरावरील किडा संकुलने मार्गा लागली असली तरी तालुका पातळीवरील क्रिडा संकुल मात्र रखडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे . याकरीता यावल तालुक्यात जागा उपलब्ध आहे याशिवाय क्रिडा संकुलनांच्या बांधकामासाठी ३ कोटी ६५ लाख रूपयांचा निधी देखील मंजुर प्राप्त आहे. दरम्यान आता पर्यंतचे चित्र बघता यावल तालुक्यात क्रिडा संकुलनाचे काम मार्गी लागेल की नाही, याबाबत संशय वाटत आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्याच्या क्रिडा संकुलानाचे अद्याप पर्यत रखडलेल्या अवस्धेत असुन, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही वेळोवेळी या विषयाचा पाठपुरावा केला असुन, दरम्यान खा.रक्षाताई खडसे यांची केन्द्र शासनाच्या मंत्रीमंडळात क्रिडामंत्री झाल्या असून ,आपल्या कडुन शासनस्तरावर यावल तालुक्यातील क्रिडा संकुलनाचा अनेक दिवसापासुन प्रलंबीत विषय मार्गी लागेल अशी अपेक्षा केन्द्रीय मंत्री ना .रक्षाताई खडसे यांना दिलेल्या निवेदनाव्दारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर, तालुका अध्यक्ष मुकेश बोरसे, यावल तालुका उपाध्यक्ष शाम पवार, किशोर नन्नवरे, गौरव कोळी आदी पक्षाच्या पदाधिकारी यांनी दिले आहे.