Home Uncategorized  श्री नरेंद्राचार्यजी संस्थानाचे कार्य कौतुकास्पद – नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील

 श्री नरेंद्राचार्यजी संस्थानाचे कार्य कौतुकास्पद – नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रक्तदान हे खऱ्या अर्थाने महादान असून, अशा उपक्रमांमुळे अनेक गरजू रुग्णांचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन लोकनियुक्त नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. श्री रामानंदाचार्यजी नरेंद्राचार्यजी संस्थानाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिरांमुळे समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळत असून मानवतेच्या सेवेसाठी संस्थानाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

श्री जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या वाढदिवसानिमित्त पारोळा येथील कुटीर रुग्णालयात आयोजित ‘जीवनदान महाकुंभ’ रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील बोलत होते. या कार्यक्रमाला टायगर स्कूल व प्रवक्ता अकॅडमीचे अध्यक्ष रवींद्र पाटील, सेवा समिती तालुकाध्यक्ष धनराज खैरनार, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शिवाजी शेळके, कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जिनेंद्र पाटील, वैद्यकीय अधिकारी गिरीश जोशी, प्रशांत वाल्हडे, राम उपरे तसेच पत्रकार योगेश पाटील, दिलीप सोनार, विकास चौधरी, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना रवींद्र पाटील यांनी सांगितले की, अपघातग्रस्त रुग्ण, शस्त्रक्रिया करणारे रुग्ण, प्रसूतीदरम्यान अडचणीत असलेल्या माता तसेच थॅलेसेमिया, कॅन्सर यांसारख्या आजारांनी ग्रस्त रुग्णांना नेहमीच रक्ताची गरज भासते. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिरे ही आरोग्यसेवेसाठी अत्यंत मोलाची ठरतात आणि समाजासाठी मोठे योगदान देतात.

सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत पार पडलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण ३७ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. रक्त संकलनासाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय पथकाचे मोलाचे सहकार्य लाभले. यामध्ये डॉ. श्रद्धा गायोल, डॉ. अजय गावडे, प्रदीप पाडवी, दीपक हनुमाने, शदाब खान, रेहान शेख, सतीश गाडी लोहार, प्रभाकर पाटील, जगन्नाथ जाधव आणि ऋषभ मेटकर यांचा समावेश होता.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सेवा समितीचे खुशाल पाटील, विजय चौधरी, दत्तात्रय बागुल, ईशान भालेराव, किरण कासार, राजू शिंपी, प्रकाश पाटील, श्रावण गोसावी, गरमक राठोड, आशाबाई पाटील, अनिता पाटील, रेखा पाटील, मनिषा पाटील, सुनिता पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound