जळगाव (प्रतिनिधी) शहरातील शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे भुमीपूजन दि.१८ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. दि.२५ रोजी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानंतर सुरुवातीला रेल्वे प्रशासनाने काम केले. गुरुवारी दुपारी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विकासकांच्या उपस्थितीत पुलाच्या जोडरस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली.
शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपुलाच्या मधोमध असलेल्या भागाचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी दि.२५ पासून पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. गुरुवारी दुपारी पत्र्या हनुमान चौकापासून पुलाच्या पायथ्याशी जोडरस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील, सह अभियंता सुभाष राऊत व इतर अधिकारी आणि विकासकांचे अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.